मद्यपी म्हणतायत अरेरे, हे काय... कारण राज्यात दारू विक्रीला परवानगी मिळणार नाही

मद्यपी म्हणतायत अरेरे, हे काय... कारण राज्यात दारू विक्रीला परवानगी मिळणार नाही

मुंबई : देशात लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आलं आहे. २० एप्रिलपासून काही उद्योग आणि काही गोष्टी अंशतः सुरु करण्यात आल्या आहेत. त्यात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्य्मातून जनतेशी संवाद साधताना सोशल डिस्टंसिंग नियम पाळून नियमावली बनवून दारूची दुकानं सुरु होऊ शकतात असे सूचक संकेत दिले होते. मात्र आता त्यांनी आपल्या या विधानावरून घुमजाव केलं आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जात असेल तर दारू विक्रीची दुकानं पुन्हा सुरू करण्यात येतील असं विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. मात्र आता राजेश टोपे यांनी यावर आता घुमजाव केलं आहे. राज्यात दारू विक्रीला कोणतीही परवानगी देण्याचा सरकारचा विचार नाही असं टोपे म्हणालेत. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल संध्याकाळी फेसबुक लाइव्हवरून राज्यातील जनतेशी आणि प्रत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरंही दिली. केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वामंध्ये दारू विक्रीवर कडक निर्बंध घातले आहेत. मात्र राज्य सरकारनं दारू विक्रीबाबतच्या भूमिकेवर कोणतेही स्पष्टीकरण दिलं नाही.

मात्र आता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जात असेल तर राज्यात पुन्हा दारू विक्री सुरू केली जाऊ शकते, असं टोपे यांनी सांगितलं होतं. या यांच्या विधानामुळे ट्विटरवरून अनेक मद्यपींनी त्यांचे आभार मानले होते. मात्र आता लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल असं घुमजाव राजेश टोपे यांनी केलंय.

maharashtra state government is not planning to open liquor stores says rajesh tope

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com