लंडनच्या धर्तीवर आता #MumbaiEye ; आता आकाशातून पाहा संपूर्ण मुंबई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुंबई - आपली मुंबई आकाशातून कशी दिसेल हे पाहायला आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. पण आता यासाठी तुम्हाला विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये जाण्याची गरज नाही. येत्या काळात महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून  मुंबईत एक नवीन प्रकल्प साकारला जाऊ शकतो. हा प्रकल्प आहे मुंबई आय (Mumbai Eye) चा.

मुंबई - आपली मुंबई आकाशातून कशी दिसेल हे पाहायला आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. पण आता यासाठी तुम्हाला विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये जाण्याची गरज नाही. येत्या काळात महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून  मुंबईत एक नवीन प्रकल्प साकारला जाऊ शकतो. हा प्रकल्प आहे मुंबई आय (Mumbai Eye) चा.

मुंबई आय (Mumbai Eye) म्हणजे एक भव्य आकाशपाळणा. लंडन, सिंगापूर आणि अनेक मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचा भव्य आकाशपाळणा बनवण्यात आलाय. आणि याच धर्तीवर मुंबईत 'मुंबई आय' बनवण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आला. याबाबत सर्व मंत्री सकारात्मक असल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि याबाबत माहिती दिली. 

हेही वाचा - ३३ वर्षानंतर मिळाली आईची चेन, फक्त आज आई असायला हवी होती

लंडनच्या धर्तीवर मुंबईतही जर 'मुंबई आय' तयार झालं मायानगरी मुंबई आकाशातून पाहणं शक्य होईल. 

जाणून घ्या, कसं आहे 'लंडन आय' (London Eye)

  • लंडन-आय हा लंडनमधील थेम्स नदीवर उभारण्यात आलेला भव्य आकाशपाळणा आहे
  • अनेक पर्यटक दररोज 'लंडन-आय'च्या माध्यमातून लंडन शहर आकाशातून पाहतात. 
  • 'लंडन-आय'मधून सपूर्ण लंडन शहर दिसते
  • 'लंडन-आय'मधून तब्बल ४० किमीपर्यंतचा परिसर पाहता येतो
  • एका वेळी ८०० लोकं या आकाशपाळण्यामधे बसू शकतात
  • या आकाशपाळण्याला एक फेरा पूर्ण करण्यासाठी साधारण पस्तीस ते चाळीस मिनिटं लागतात.   

मोठी बातमी - मंगेशकर कुटुंबाची फडणवीसांवर नाराजी, पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले..

आता लंडनच्या धर्तीवर मुंबईतही 'मुंबई आय' साकारण्याची चर्चा सुरु आहे याचं मुंबई करांकडून स्वागत करण्यात येतंय. 

maharashtra state government is planing to built mumbai eye in mumbai     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state government is planing to built mumbai eye in mumbai