esakal | हुश्श... शिक्षकांचा मार्च महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटला!

बोलून बातमी शोधा

हुश्श... शिक्षकांचा मार्च महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटला!
हुश्श... शिक्षकांचा मार्च महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटला!
sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई: राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांचे मागील महिन्यापासून रखडलेले वेतन लवकरच मिळणार आहे. या वेतनासाठी वित्त विभागाने मान्यता दिली असल्याने या साठीची कारवाई पुढील दोन दिवसात होणार आहे. मात्र यासाठी आता शिक्षक संघटनांमध्ये श्रेयासाठी चढाओढ लागली असल्याचे चित्र आहे. आपल्याच पाठपुराव्यामुळे मार्च महिन्याच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला असा दावा सर्वांकडून केला जात आहे. अनुदानित शाळांतील शिक्षकांचे मागील काही महिन्यात वेतन शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे लंबणीवर पडत असल्याने त्या विषयी संताप व्यक्त केला जात होता.

हेही वाचा: मुंबईकरांनो, थांबा... लसीकरणासाठी जाण्याआधी ही बातमी वाचाच!

शिक्षकांच्या वेतनासंबंधी मागील महिन्यात आठहून अधिक वेळा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शालेय शिक्षण आणि वित्त विभागाकडे पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेनेही चारहून अधिक वेळा पत्रव्यवहार करत शिक्षकांच्या वेतनासाठी होत असलेल्या दिरंगाईकडे सरकारचे लक्ष वेधले होते. यासोबत शिक्षक भारती या संघटनेनेही यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेतनासाठी होत असलेल्या दिरंगाईकडे लक्ष द्यावे आणि शिक्षकांचे वेतन लवकर मिळावे, अशी मागणी केली होती. तर भाजप शिक्षक सेलनेही वेळोवेळी वेतनासाठी उशीर केला जात असल्याने आम्हाला याविषयी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल, असा इशारा दिला होता.