कार्तिकी एकादशीनिमित्त ST सोडणार तब्बल 'एवढ्या' जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

मुंबई :  कार्तिकी एकादशी यात्रेला पंढरपूरसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी राज्याच्या विविध बसस्थानकांवरून सुमारे 1300 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. 6 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही जादा वाहतूक केली जाणार आहे. याशिवाय आवश्‍यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आलेले आहेत. 

कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक प्रवाशांची सोय करण्याच्या हेतूने दरवर्षीप्रमाणे एसटीने यंदादेखील 1300 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. या यात्रेला विशेषतः कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या विभागातून भाविक प्रवाशांची जास्त गर्दी होते. यास्तव या पाच विभागांतून ही सेवा देण्यात येणार आहे.

'या' आहेत सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी..  

यामध्ये मुंबई- 110, रायगड- 100, सिंधुदुर्ग- 30, ठाणे- 30, रत्नागिरी- 120 विशेष अशा जादा बसेस सोडण्यात येत आहेत. पंढरपूर येथे स्थानिक बसस्थानकाबरोबरच चंद्रभागानगर येथे विभागनिहाय तात्पुरत्या बसस्थानकाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

WebTitle : maharashtra state transport to run 1300 extra buses for kartiki ekadashi 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state transport to run 1300 extra buses for kartiki ekadashi