मुंबईत दोन दिवस पावसाचा गडगडाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

मुंबईत दोन दिवस पावसाचा गडगडाट

मुंबई : विजांचा कडकडात आणि ढगांच्या गडगडाटाने आसमंत भरून गेला. रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने काहीसा गारवा पसरला होता.

मुंबई हवामान विभागाने आज मुंबईत सह राज्यातील अनेक भागात येत्या 48 तासात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मुंबईत अनेक भागात आज ढगाळ वतावरण होते. अखेर रात्री 8:30 च्या दरम्यान पाऊस पडला. दक्षिण मुंबई तसेच मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कुलाबा,वडाळा, दादर,कुर्ला,वांद्रे परिसरात पावसाच्या जोरदार हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा पसरल्याने उकड्यापासून मुंबईकरांची सुटका झाली. रविवारी अनेक जण घरीच असल्याने लोकांनी घरातूनच पावसाचा आनंद घेतला.

हेही वाचा: पुणे : गुळंचवाडी येथे अपघातात एक ठार, दोन जण जखमी

पूर्व मध्य व पश्र्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याच्या हवेच्या वरच्या थरातील चक्राकार सिस्टिम मधून निर्माण झालेली द्रोणीय स्थिती महाराष्ट्रपर्यंत आली आहे.परीणामी पुढच्या 2 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे. यादरम्यान मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: Corona Update : राज्यात 845 नवीन रुग्णांची भर 17 रुग्णांचा मृत्यू

मुंबईसह उत्तर रायगड, पनवेल,कल्याण, माथेरान आणि नवी मुंबईतील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. विदर्भात देखील पावसाचा जोर दिसला. याशिवाय नागपूर,चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. उद्या देखील या भागात पावसाची स्थिती राहण्याचा अंदाज आहे.

loading image
go to top