Maharashtra Vidhan Bhavan Bomb Threat Email
esakal
राज्याचे विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्रास्त झाला आहे. त्यामुळे विधानभवन परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी हा ईमेल प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाल करत संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली आहे. मात्र, हा धमकीचा ई-मेल बनावट (हॉक्स) असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी तपास यंत्रणांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.