

Mumbai rain update
ESakal
मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत कमाल तापमान सुमारे ३५ अंश सेल्सिअस नोंदवले जात होते, परंतु अतिरिक्त आर्द्रतेमुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत होता. मात्र, आता अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे हवामान पूर्णपणे बदलले आहे. हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला असून मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याची पुष्टी केली आहे.