
मुंबई : आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज पहाटेपासूनही राज्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत.