esakal | 'मी कुठे नाराज' म्हणणाऱ्या वडेट्टीवारांकडे मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी
sakal

बोलून बातमी शोधा

'मी कुठे नाराज' म्हणणाऱ्या वडेट्टीवारांकडे मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी

'मी कुठे नाराज' म्हणणाऱ्या वडेट्टीवारांकडे मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी

sakal_logo
By
प्रशांत बारसिंग

मुंबई -  कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली असून त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे वडेट्टीवार यांनी आज मंत्रालयात मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला. 

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात रात्री उशिरा बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले. त्यांनी कॉंग्रेसच्या के सी वेणुगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर फोनवरुन वडेट्टीवार यांचे पक्षश्रेष्ठींशी बोलणे करुन दिल्यावर वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली आहे. शिवसेनेकडे असलेले मदत व पुनर्वसन खाते विजय वडेट्टीवार यांना दिल्यावर त्यांनी पदभारही स्वीकारला. विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या खात्यांमध्ये आधी भूकंप पुनर्वसन खाते होते. तर शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन हे विभाग होते. आता मदत व पुनर्वसन हे खाते वडेट्टीवार यांच्याकडे असणार आहे.

धक्कादायक - शिकवणीला येणाऱ्या मुलीच्या प्राव्हेट पार्टमध्ये पेन्सिल घालून काढायची व्हिडीओ, पोलिसांनी घेतलं ताब्यात

दोनच दिवसांपूर्वी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडले. मात्र नाराजीमुळे विजय वडेट्टीवार यांनी दांडी मारल्याची चर्चा होती. परंतु "कौटुंबिक कारणामुळे मी अधिवेशनाला उपस्थित राहिलो नाही. याची कल्पना मी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना दिली, त्यांच्या परवानगीनंतरच मी गैरहजर होतो, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूरचे पालकमंत्रीपद विश्‍वजित कदम यांच्याकडे? 

दरम्यान, कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्रीपद कॉंग्रेसचे राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या पालकमंत्रयांची यादी दोन दिवसापूर्वी जाहीर करण्यात आली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोल्हापूर तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगर जिल्हयाची जाबाबदारी देण्यात आली होती. मात्र थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला.

मोठी बातमी -  पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का; मानखुर्दमध्ये शिवसेनेचा झेंडा.. 

या संदर्भात बाळासाहेब थोरात म्हणाले की, कॉंग्रेसच्या वाटयाला बारा मंत्रीपदे आणि अकरा पालकमंत्रीपदे मिळाली आहेत. मी स्वतः महसूलमंत्री असून विधिमंडळातील गटनेता आहे. तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जाबाबदारीही माझयाकडे आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद नाकारण्याचा मी निर्णय घेतला. यामुळे कॉंग्रेसच्या अन्य मंत्रयाला न्याय मिळणार आहे. 

दरम्यान, कोल्हापूर जिल्हयातील वजनदार नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील भंडारा जिल्हयाचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी द्यावी का, यावर कॉंग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. दुसरीकडे डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र विश्‍वजित कदम राज्यमंत्री आहेत. त्यांना कोल्हापूरचे पालकमंत्री करावे का, याबाबतही कॉंग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. 

मोठी बातमी -   पश्‍चिम रेल्वेवर आजपासून रात्रकालीन ब्लॉक.. वाचा कोणत्या लोकल रद्द !

mahavikas aaghadi minister vijay vadettiwar took charge of his ministry