ठाण्यात महाविकास आघाडी देणार भाजपला धक्का?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

गेल्या दोन वर्षापासून रखडलेली ठाणे महापालिका परिवहन समितीची (टीएमटी) निवडणूक येत्या 4 मार्चला होणार आहे. परिवहन समितीवर जाण्यासाठी 12 जणांना संधी मिळणार आहे. अशावेळी निवडणूक टाळण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून केवळ 12 जण समितीवर जातील, अशी अटकळ बांधली जात होती. पण 12 जागांसाठी तब्बल चौदा अर्ज दाखल झाल्याने या समितीसाठी निवडणूक अटळ असल्याचे मानले जात आहे. पण त्यामुळे याचा फटका भाजपाला बसण्याची शक्‍यता आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून सात, राष्ट्रवादीकडून चार, भाजपकडून दोन आणि कॉंग्रेसकडून एका सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

ठाणे : गेल्या दोन वर्षापासून रखडलेली ठाणे महापालिका परिवहन समितीची (टीएमटी) निवडणूक येत्या 4 मार्चला होणार आहे. परिवहन समितीवर जाण्यासाठी 12 जणांना संधी मिळणार आहे. अशावेळी निवडणूक टाळण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून केवळ 12 जण समितीवर जातील, अशी अटकळ बांधली जात होती. पण 12 जागांसाठी तब्बल चौदा अर्ज दाखल झाल्याने या समितीसाठी निवडणूक अटळ असल्याचे मानले जात आहे. पण त्यामुळे याचा फटका भाजपाला बसण्याची शक्‍यता आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून सात, राष्ट्रवादीकडून चार, भाजपकडून दोन आणि कॉंग्रेसकडून एका सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

आपापल्या नवऱ्यांसाठी "त्या'' दोघींनी किडन्यांची केली आदलाबदली

मुळात महापालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार शिवसेनेकडून सात, राष्ट्रवादीकडून तीन आणि भाजपकडून दोन सदस्यांनी अर्ज दाखल करणे अपेक्षित होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असता. पण राष्ट्रवादीकडून एक जादा आणि कॉंग्रेसकडून संख्याबळ नसतानाही अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चढाओढ निर्माण झाली आहे. पक्षीय बलानुसार शिवसेनेचे सात सदस्य परिवहनमध्ये जाण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार शिवसेनेकडून सात अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. 

शिवसेनेच्या प्रत्येक निवडणुकीत एबी फॉर्म, उमेदवारी अर्ज देण्याचे काम सांभाळणारे विलास जोशी यांना संधी देण्यात आली आहे. तर अरुण पाटील, प्रकाश कोटवानी, पुजा वाघ, मिलिंद मोरे, बालाजी काकडे आणि राजेंद्र महाडीक यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादीकडून शमीम खान, प्रकाश पाटील, मोहसीन शेख आणि नितीन पाटील असे एकूण चार अर्ज दाखल झाले आहेत. तर भाजपकडून सुरेश कोलते आणि विकास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे पुरेसे संख्याबळ नसतानाही कॉंग्रेसकडून राम भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. 

शिवसेना म्हणतेय...फडणवीस तुम्ही कामाला लागा

शिवसेनेपुढे पेचप्रसंग 
राज्यात महाविकास आघाडी असल्याने परिवहनमध्ये जाण्यासाठी संधी मिळावी अशी अपेक्षा कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीने जादा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेनेपुढे पेचप्रसंग उभा राहिला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून भाजपला रोखण्यासाठी परिवहनमध्ये रणनिती सुरू असल्याची चर्चा आधीपासून होती. त्यानुसार भाजपने दोन अर्ज दाखल केले असले तरी शिवसेनेचे मत आपल्या उमेदवाराबरोबर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाले तर भाजपचा एकच सदस्य परिवहनमध्ये जाण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी मतांची विभागणी करताना शिवसेनेचा एक सदस्य कमी होण्याची शक्‍यताही व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aaghadi Will push BJP in TMT?