एपीएमसी निवडणुकीत महाविकासआघाडीचा वरचष्मा; बिनविरोध झाली सभापतींची निवड

शरद वागदरे
Tuesday, 1 September 2020

राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोधात  बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदावर निवड झाल्यामुळे महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे.

वाशी :  आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस-कॉंग्रेसने बाजी मारली आहे. सोमवारी( ता. 31) झालेल्या नवी मुंबईतील एपीएमसी मुख्यालयामध्ये पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रसेचे असणारे अशोक डक यांची सभापतीपदी, तर कॉंग्रेसचे धनंजय वाडकर यांची उपसभापतीपदी निवड झाली. सभापती व उपसभापती पदासाठी एक एकच अर्ज आल्याने ही निवडणुक बिनविरोध पार पडली. 

श्वास घेण्यास त्रास होत होता; तपासल्यावर समजले की हृदयाच्या महाधमनीची झाली होती अवाजवी वाढ

राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोधात  बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदावर निवड झाल्यामुळे महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या संचालक मंडाळाच्या निवडणुकीत 18 पैकी 16 संचालक महाविकास आघाडीचे निवडून आल्यामुळे सभापती व उपसभापतीच्या पदावर महाविकास आघाडीचे सभापती व उपसभापती होणार हे निश्चित होते. मात्र भाजपने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पण भाजपला खाते देखील उघाडता आले नव्हते. 

महाविकास आघाडीचा वाद 'तीन हात नाक्या'वर, काँग्रेसच्या बॅनरमुळे राजकीय खळबळ

दरम्यान, कोरोनामुळे निवडणूकही रखडली होती. अखेर 31 ऑगस्ट रोजी एपीएमसी मुख्यालयात पार पडली. यावेळी निवडणूक प्रक्रियेच्या वेळी दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्जच दाखल झाला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सोनवणे यांनी सभापतीपदासाठी अर्ज आलेले अशोक डक आणि उपसभापतीपदासाठी अर्ज आलेले धनंजय वाडकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत मुख्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडल्याची माहिती निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी दिली.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikas aaghadi won apmc election in washi, ncp and congress gets win