esakal | महाविकासआघाडी सरकार अकरा दिवसात कोसळू शकतं : नारायण राणे
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकासआघाडी सरकार अकरा दिवसात कोसळू शकतं : नारायण राणे

महाराष्ट्रातील सरकार अकरा दिवसात कोसळेल असे भाकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे.

महाविकासआघाडी सरकार अकरा दिवसात कोसळू शकतं : नारायण राणे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः महाराष्ट्रातील सरकार अकरा दिवसात कोसळेल असे भाकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील अंजुर येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  

कॉलेजमधील निवडणूकांबाबत शरद पवार म्हणाले की,....

या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, महाराष्ट्रातील एकूण घडामोडी पाहता महाराष्ट्रातील सरकार आज पडेल की उद्या अशी परिस्थिती झाली आहे पण मी त्यासाठी अकरा दिवसांची मुदत वाढवून देतो. अकरा दिवसांमध्ये सरकार पडेल का? हे माध्यमांनी पाहावे पण मला वाटते हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल असे वाटते. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही प्रकारे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही.  विकास कामे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत फक्त आश्वासन दिली. पण पूर्तता करण्याची मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांमध्ये दिसत नाही. फक्त सत्तेसाठी व पदासाठी व सत्तेतून पैसा व पैशातून सत्तेसाठी एकत्र आलेली ही मंडळी आहेत. म्हणून हे सरकार कधीही कोसळेल असे भाकीत मी करीत आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर पीएचडीवर शरद पवारांचं जबरजस्त उत्तर

शिवसेनेने नागरीकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात सुरुवातीला पाठिंबा राज्यसभेत विरोध केला. पुन्हा पंतप्रधान मोदी यांना भेटल्या नंतर त्यांची भूमिका बदलली. हे चांगले झाले ,चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. भाजपा सेना भविष्यात एकत्र येतील का? यावर हे सांगण्यासाठी मी ज्योतिष नसून त्यासाठी ज्योतिषाकडे जावा लागेल, पण भविष्यात काहीही होऊ शकते अशी समिकरणे माध्यमांकडून दिसून येत आहेत. पाहूया अकरा दिवसात काय होत ते.

loading image