

पनवेल : पनवेल महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने भाजपविरोधात सक्षम व एकसंघ आव्हान उभे करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. आघाडीतील विखुरलेली मते एकत्र आणत सामूहिक लढत उभारण्याचे प्रयत्न सध्या अंतिम टप्प्यात असून, जागावाटप व उमेदवारी निश्चितीसाठी सातत्याने बैठका सुरू आहेत.