उल्हासनगर : स्मार्ट मीटर बसविण्यावरून उल्हासनगरात सुरू असलेला विरोध आता वीज कर्मचाऱ्यांना थेट बारमध्ये कोंडून ठेवण्यापर्यंत पोहोचला आहे..नेमकं प्रकरण काय?कॅम्प क्रमांक ५ येथील गांधी रोडवरील अब्बु बार हॉटेलमध्ये बुधवारी (ता. ७) सहाय्यक अभियंता तन्वीर हिंदुराव है प्रधान तंत्रज्ज्ञ दिलीप भिल, विद्युत सहाय्यक कोमल टेंगडे व ज्योती कुंभारे, बाह्यस्रोत कर्मचारी रमाकांत पाटील आणि सुशांत जेटे यांच्यासह मीटर बसविण्यासाठी गेले होते. वेटर रंजीत ठाकुर याने व्यवस्थापक विवेक गुप्ता याला फोन केल्यावर, हिंदुराव यांनी स्मार्ट मीटरबाबत माहिती दिली. कर्मचारी मीटर बदलून बाहेर पडताना गुप्ता याच्या सांगण्यावरून विवेकने हॉटेलच्या गेटला आतून कुलूप लावले. याप्रकरणी दोघांविरोधात हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..Mumbai News: शिक्षकाला मारहाणप्रकरणी महापौर तावडेंना दंड, न्यायालयाचा इशारा.धोकादायक इमारतीत जोडणीभिवंडी महापालिकेने धोकादायक इमारतीचा पाणीपुरवठा व वीज खंडित केली, तिलाच स्थानिक वीज कंपनीने नवीन वीज मीटर लावल्याची घटना रावजीनगर भागात घडली आहे. या घटनेने परिसरातील जागरूक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे..शहरातील कल्याणरोड रावजी नगरमधील प्रभाग समिती क्र.२ येथील पालिका घर क्र. २३९ ही आरसीसी इमारत असून पालिकेने १३ एप्रिल रोजी धोकादायक म्हणून घोषित करून ती निष्कासित करण्याची नोटीस बजावली आहे. त्याचप्रमाणे या धोकादायक इमारतीचा नागरिकांनी वापर करू नये, म्हणून पालिका अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा खंडित करून शहरास खासगी कंपनीमार्फत वीज पुरवठा खंडित केला होता..परंतु पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी इमारत निष्कासित करण्याची कारवाई न केल्याने या इमारतीमध्ये संबंधित वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नव्याने दोन मीटर लावून वीजपुरवठा नियमित केला आहे. या प्रकरणी पालिकेच्या प्रभाग समिती क्र. २ च्या प्रभाग अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रार केली आहे. शहरातील अनेक धोकादायक इमारतीचा महापालिकेने वीज व पाणीपुरवठा खंडित करून त्या इमारतीमधील नागरिकांना इमारतीबाहेर काढलेले नाही..Chandrashekhar Bawankule: सर्वजातीय विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृह उभारणार, चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा .'कोहिनूर' नंतरही निष्काळजीकाही महिन्यांपूर्वी नारपोली-भंडारी कंपाउंडमधील कोहिनूर ही धोकादायक इमारत कोसळून १० नागरिकांचा मृत्यू झाला. या इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करूनदेखील इमारतीमधील नागरिकांना इमारतीबाहेर काढून निष्कासित करण्याची कारवाई प्रभाग अधिकाऱ्यांनी केली नव्हती..संबंधित धोकादायक इमारतीमध्ये खासगी कंपनीमार्फत नव्याने दोन वीज मीटर लावल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणी पालिकेमार्फत कंपनीला पत्र पाठवून कारवाई करण्यात येणार आहे.- विनोद मनोरे, प्रभाग अधिकारी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.