
mahayuti controversy
ESakal
डोंबिवली : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये मात्र युतीच्या चर्चावरून कलगीतुरा रंगला असल्याचे दिसून येते. अंबरनाथ बदलापूर मध्ये भाजप, राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट असे वातावरण असताना कल्याण डोंबिवलीमध्ये देखील तोच कित्ता गिरवला जाईल अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यातच कल्याणमध्ये शिंदे गटाकडून भाजपला ओपन चॅलेंज करण्यात आले आहे. तर भाजपने देखील युती झाली नाही तर सर्व ठिकाणी लढण्याची ताकद, कुवत आणि धमक आमच्यात आहे असे बोलले आहे. यावरून ऐन दिवाळीत राजकीय फटाके फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.