Registration Fee: मुंबईत घर, फ्लॅट किंवा जमीन खरेदीचा विचार करताय? रजिस्ट्रेशन फी वाढीबाबत मोठी अपडेट समोर, आता किती पैसे मोजावे लागणार?

Mumbai Property News: मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्यांना लवकरच अतिरिक्त पैसे मोजावे लागू शकतात. राज्य सरकार आपला महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता नोंदणी शुल्क वाढवण्याचा गंभीरपणे विचार करत आहे.
Registration Fee

Registration Fee

ESakal

Updated on

मालमत्ता खरेदीदारांना लवकरच मालमत्ता खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागू शकतात. राज्य सरकार आपला महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता नोंदणी शुल्क वाढवण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. सध्याचे मालमत्ता नोंदणी शुल्क ३०,००० रुपयांवरून ५०,००० रुपयांपर्यंत वाढवण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. नोंदणी महानिरीक्षक विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, नोंदणी शुल्क जवळपास १० वर्षांपासून बदललेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com