
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख राहिलेले महेश गायकवाड यांची विधानसभा निवडणूक काळात पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतरही महेश हे शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठी विविध कार्यक्रमांत दिसून येत होते. यानंतर आता कल्याण पश्चिमचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी गायकवाड यांची लवकरच शिवसेना शिंदे गटात महत्त्वाच्या पदावर वर्णी लागणार आहे, चिंतेचे कारण नाही असे म्हणत महेश यांच्या घरवापसी वर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.