
कोरोना संसर्ग वाढत असल्याने 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कडक निर्बंध
प्रवाशांनो.. सावधान!!! 14 मेल-एक्सप्रेस रेल्वे रद्द, पाहा यादी
मुंबई: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील 14 एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्यातील सुट्ट्यानिमित्त रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र, यंदा दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने 'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध लावले आहेत. परिणामी, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. प्रवासी संख्या कमी असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने मेल-एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
1. गाडी क्रमांक 02147 दादर- साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 7 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02148 साईनगर शिर्डी - दादर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 8 मेपर्यंत रद्द.
2. गाडी क्रमांक 01131 दादर- साईनगर शिर्डी त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 10 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01132 साईनगर शिर्डी- दादर त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 11 मेपर्यंत रद्द
3. गाडी क्रमांक 01404 कोल्हापूर- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 10 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01403 नागपूर- कोल्हापूर द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 11 मेपर्यंत रद्द
हेही वाचा: कोरोना चाचणी करावी लागू नये म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर लोकांची पळापळ
4. गाडी क्रमांक 01139 मुंबई- गदग विशेष एक्सप्रेस 10 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01140 गदग - मुंबई विशेष एक्सप्रेस 11 मेपर्यंत रद्द
5. गाडी क्रमांक 02041 पुणे - नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 13 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02042 नागपूर - पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 14 मेपर्यंत रद्द
6. गाडी क्रमांक 02239 पुणे - अजनी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 15 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02240 अजनी - पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 16 मेपर्यंत रद्द केल्या आहेत.
7. गाडी क्रमांक 02117 पुणे - अमरावती साप्ताहिक एक्सप्रेस 12 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02118 अमरावती - पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 13 मेपर्यंत रद्द
8. गाडी क्रमांक 02036 नागपूर - पुणे त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 15 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02035 पुणे - नागपूर त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 13 मेपर्यंत रद्द
9. गाडी क्रमांक 01137 नागपूर - अहमदाबाद साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 12 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01138 अहमदाबाद - नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 13 मेपर्यंत रद्द
10. गाडी क्रमांक 02223 पुणे - अजनी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 14 मेपर्यंत रद्द
हेही वाचा: समजून घ्या लोकल ट्रेनमधुन कोणाला प्रवासाची परवानगी
11. गाडी क्रमांक 01041 दादर - साईनगर शिर्डी आठवड्यातील चार दिवस 8 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01042 साईनगर शिर्डी - दादर आठवड्यातील चार दिवस विशेष 9 मेपर्यंत रद्द
12. गाडी क्रमांक 01027 दादर - पंढरपूर त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 10 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 01028 पंढरपूर-दादर त्रि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 11 मेपर्यंत रद्द
13. गाडी क्रमांक 02235 लोकमान्य टिळक टर्मिनस - सिकंदराबाद विशेष एक्सप्रेस 28 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 02236 सिकंदराबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्सप्रेस 29 मेपर्यंत रद्द
14. गाडी क्रमांक 09125 सूरत - अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 14 मेपर्यंत आणि गाडी क्रमांक 09126 अमरावती - सूरत द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 15 मेपर्यंत रद्द
Web Title: Mail Passenger Trains Across The India Cancelled Due To Covid Forced Lockdown In Maharashtra And
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..