
मुंबई : एकाच दुचाकीवरून भरधाव आणि बेशिस्तपणे मानखुर्दच्या दिशेने निघालेल्या चौघांचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सुपारी चारच्या सुमारास गोवंडीच्या शिवाजी नगर चौकात घडला. मृतांमध्ये ४२ वर्षीय व्यक्तीसह तीन लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व साकीनाका परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.