कांदिवलीः साईबाबा मंदिरात शॉर्ट सर्किट, दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

कांदिवलीः साईबाबा मंदिरात शॉर्ट सर्किट, दुर्घटनेत दोघांचा मृत्यू

मुंबई: कांदिवली चारकोप परिसरातील साईबाबा मंदिरात काल मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास अचानक आग लागली. मंदिरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

ही आग इतकी भयंकर होती की मंदिरात झोपलेल्या लोकांना बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही आणि आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतरही आसपासच्या लोकांना घटनास्थळी पोहोचण्यास बराच उशीर झाला.

घटनेच्या वेळी मंदिराचे संस्थापक युवराज पवार(25), सुभाष खोडे(25) आणि मन्नू गुप्ता(26) मंदिरात झोपले होते. जेव्हा आग लागली हे कळले तेव्हा तिघांनीही उठून धावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी मंदिराचे कुलूप उघडले नाही आणि तिघांनीही पेट घेतला. यामध्ये युवराज पवार आणि सुभाष खोडे यांचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. मोनू गुप्ता गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आधी शताब्दी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आता त्यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मन्नू गुप्ता हे 90 ते 95 भाजले आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळतंय. 

----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Major fire sai baba temple kandivali died two one critical

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com