कुर्लातील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही

कुर्लातील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, जीवितहानी नाही

मुंबईः कुर्लामधील फिनिक्स मॉल परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातल्या फिनिक्स मॉलच्या एका कपड्याच्या दुकानात पहाटेला आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवानं या आगीत जीवितहानीचं वृत्त नसून आगीत कीती नुकसान झालं याचीही माहिती मिळू शकलेली नाही.

------------------------------------------------

Mumbai kurla phoenix marketcity mall fire break out no causality

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com