
कल्याण परिसरात रक्षाबंधनाच्या दिवशी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. कल्याण-शिळ, भिवंडी आणि शिळफाटा मार्गांवर काल रात्रीपासूनच वाहनांची लांबलचक रांग लागली होती. विशेषत: शिळफाटा रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाला आहे.