Makar Sankranti 2023 : मकरसंक्रांतीच्या पार्श्भूमीवर मुंबईत नायलॉन मांजाला पोलिसांकडून बंदी...

नियमाची पायमल्ली करणाऱ्यावर कारवाईचा इशारा
Makar Sankranti 2023 Police ban nylon manja in Mumbai
Makar Sankranti 2023 Police ban nylon manja in Mumbai sakal

मुंबई : मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मकर संक्रांतीच्या सणाच्या आधी शहरात नायलॉन मांजा वापरण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला आहे.विशाल ठाकूर, पोलीस उप आयुक्त, ऑपरेशन्स, मुंबई पोलिस यांनी हा आदेश जारी केला आहे.

सदर आदेश 12/01/2023 ते 10/02/2023 लागू राहील आणि या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत शिक्षेस पात्र असल्याचे आदेशात म्हटले आहे.

मकरसंक्रांतिच्या निमित्ताने दरवर्षी पतंग उडवून उत्सव साजरा करण्यात येतो. उत्सवादरम्यान, प्लॅस्टिक किंवा तत्सम सिंथेटिक पदार्थापासून बनवलेल्या मांजामुळे ज्याला सामान्यतः नायलॉन मांजा म्हणतात नागरिकाना आणि पक्ष्यांना दुखापत होते.

या जखमा अनेक वेळा प्राणघातक ठरतात आणि त्यामुळे माणसे आणि पक्ष्यांचा मृत्यू होतो. म्हणूनच, नायलॉन किंवा प्लास्टिक किंवा सिंथेटिक धाग्यापासून बनवलेल्या पतंग उडवण्याच्या धाग्याच्या घातक परिणामांपासून लोक आणि पक्ष्यांचे संरक्षण व्हावे यासाठी आदेश लागू केला असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

आदेशात पुढे म्हटले आहे की, जैव-विघटनशील नसल्यामुळे पर्यावरण हानी देखील होते. त्यामुळे जीवितहानी, पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी अशा नायलॉन धाग्यांचा वापर रोखणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com