रस्त्यांच्या हद्दीचे वाद नको, खड्डे दुरुस्तीसाठी एकत्रित पथक तयार करा; मुख्यमंत्र्याचे मुंबई पालिकेला आदेश  

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 4 जुलै 2020

पावसाळ्यात रस्त्यांच्या हद्दीचा वाद न आणता खड्डे दुरुस्ती करा. अशी ताकिदच आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. त्यासाठी एकत्रित पथक तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत.

मुंबई: पावसाळ्यात रस्त्यांच्या हद्दीचा वाद न आणता खड्डे दुरुस्ती करा. अशी ताकिदच आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. त्यासाठी एकत्रित पथक तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली.या बैठकीत त्यांनी रस्त्यांच्या हद्दीवरुन खड्डे दुरुस्तीच्या होणार्या वादावर बोट ठेवले.मुंबईत महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,सार्वजनिक बांधकाम विभाग,मुंबई पोर्ट ट्रस्ट तसेच इतर प्राधिकरणाचे रस्ते आहेत.

हेही वाचा: मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर 18 दिवसांमध्ये तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा लोकल प्रवास..   

पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर ते दुरुस्त करण्यावरुन हद्दीचा वाद निर्माण होता.या वादाचा नाहक त्रास नागरीकांना होतो.तर, दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत रस्त्यावर खड्डे पडत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

महापालिकेने एमएमआरडीए, रेल्वे, बीपीटी, मेट्रो, एअरपोर्ट ॲथोरटी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या सर्व संबंधित यंत्रणांची समन्वय बैठक आयोजित करून सर्व कामांना गती द्यावी. 

हेही वाचा: लोकहो शंभर टक्के काळजी घ्यावीच लागेल, कारण कोविड बरोबरच आता याचाही 'मोठा' धोका

रस्त्यांच्या खड्ड्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांचे एकत्रित पथक स्थापन करण्यात यावे. रस्ता कुणाच्याही ताब्यातील असो, त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे काम केले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

make combine force for road repairing udhhav thackeray gave order 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: make combine force for road repairing udhhav thackeray gave order