esakal | पंचनामे काटेकोर करा
sakal

बोलून बातमी शोधा

विजय वडेट्टीवार

पंचनामे काटेकोर करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात जुलै व ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. पिकांसोबतच इतर बाबींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, हे लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने काटेकोरपणे पंचनामे करावेत, कोणताही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.

हेही वाचा: दिड वर्षानंतर पोलीस बदल्यांना मुहूर्त; ८५ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या जिल्ह्यांचा वडेट्टीवार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याबरोबरच विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, ‘‘राज्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अजूनही पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनांकडून पंचनामे केल्यानंतर नुकसानीचे आकडे वाढत आहेत. विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी काही प्रातिनिधीक ठिकाणी जावून पंचनामे केले आहेत. अशा ठिकाणांची पाहणी करावी. कोणतीही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये, ही खबरदारी घ्यावी. तसेच केलेल्या पंचनाम्यांची शहानिशा करावी.’’

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 458 रुग्णांची भर; 6 जणांचा मृत्यू

वडेट्टीवार म्हणाले, की शेती, घरे, पशुधन, फळबागा, शेतजमीन, खचलेली क्षेत्रे, दरडी कोसळेलेल्या शेतजमिनी, ग्रामीण भागातील रस्ते, शाळा, शासकीय इमारती, पूल तलाव याबाबत तसेच इतर बाबींच्या नुकसानीची माहिती शासनाला सादर करावी. ज्या ठिकाणी तातडीने मदत आवश्यक आहे, अशा वेळी राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत तातडीने घेण्यात यावी. मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी विभागाने करावयाच्या कार्यवाहीची माहिती बैठकीत दिली.

हेही वाचा: यूसूफ लकडवाला यांचा कारागृहात मृत्यू

"कोरोना परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे. शासनाकडून जुलै महिन्यात जाहीर केलेल्या मदतीचे वाटप करण्याबाबतही लवकरच निर्णय होणार आहे."

- विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री

loading image
go to top