Malabar Hill Mumbai : मलबार हिल टेकडीला संरक्षक भिंत उभारणार

पावसाळ्यात मलबार हिल टेकडीच्या उतारावरून माती आणि दगड आदींची मोठ्याप्रमाणात घसरण झाल्यामुळे बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या लाद्यांना काही ठिकाणी तडे गेले आहेत.
Malabar Hill Mumbai
Malabar Hill Mumbaisakal
Summary

पावसाळ्यात मलबार हिल टेकडीच्या उतारावरून माती आणि दगड आदींची मोठ्याप्रमाणात घसरण झाल्यामुळे बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या लाद्यांना काही ठिकाणी तडे गेले आहेत.

मुंबई - पावसाळ्यात मलबार हिल टेकडीच्या उतारावरून माती आणि दगड आदींची मोठ्याप्रमाणात घसरण झाल्यामुळे बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या लाद्यांना काही ठिकाणी तडे गेले आहेत. तसेच या जागेखालून पाणी पुरवठा करणाऱ्या ११ जलवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य दुघर्टना टाळण्यासाठी महापालिकेने या टेकडीला संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी पालिका अडीच कोटी रुपये खर्च करणार आहे.

मलबार टेकडी येथील पुरातन बाबुलनाथ मंदिर तसेच करवा चौथ पॉईंट याठिकाणी मोठ्याप्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. याठिकाणी टेकडीच्या उतारावरून पावसाळ्यात माती व दगडाची घसरण होते. त्यामुळे काही ठिकाणी तडे गेले आहेत. तर काही ठिकाणी भिंतही पडल्याच्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाबुलनाथ मंदिर ते करवा चौथ येथील काही भागाची टप्प्यासहित संरक्षक भिंत बांधून पायऱ्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

खचलेल्या टेकडीच्या जागेखालून ३०० मी.मी. ते १२०० मी.मी व्यासाच्या मोठमोठ्या ११ जलवाहिन्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात जर टेकडीचा भाग खचून कोणत्याही प्रकारची दुघर्टना घडल्यास तर या जलवाहिन्या फुटू शकतात. परिणामी यामुळे पाणीपुरवठा खंडित होऊ होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com