मालाडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

stray dogs
stray dogs sakal media

मालाड : मालाड पश्चिमेतील (Malad west) लिबर्टी गार्डनचा परिसर (liberty garden area) सध्या भटक्या कुत्र्यांचे (stray dogs) आश्रयस्थान झाला आहे. येथील प्रत्येक गल्लीत १०-१२ भटकी कुत्री सहज आढळून येतात. ते पादचाऱ्यांवर (Attack on pedestrian) हल्ले करतात. त्यामुळे परिसरात त्यांची दहशत माजली आहे.

stray dogs
"मुंबई मराठी ग्रंथालय कार्यकारी मंडळाची नियुक्ती बेकायदेशीर"

महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, त्यात श्वानप्रेमींकडून बिस्किटे आणि दूध सकाळ-संध्याकाळ दिले जाते. त्यामुळे येथे त्यांचे प्रमाण वाढले आहे. मामलेतदार वाडी क्रमांक सहामध्ये सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. २४ सप्टेंबरला सीता सेठिया घरकामासाठी मामलेतदार वाडी गल्ली क्रमांक सहा येथे आल्या असता एका भटक्या कुत्र्याने त्यांना चावा घेतला. मालाडमध्ये पालिका रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्यांना थेट केईएम गाठावे लागले. १८ ऑक्टोबरला रात्री आठ वाजता सीमा झवेरी या घरकामासाठी जात असताना कुत्र्याने त्यांच्या पायाचा चावा घेतला. इथे अनेकांना या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

कित्येकांनी तर गल्ली क्रमांक सहामधील कामे सोडली आहेत. इतकेच काय गल्लीच्या बाहेरील अनेक दुकानदार, हॉटेलवाले गल्लीमध्ये होम डिलिव्हरी करणे नाकारत आहेत. यामुळेही येथील सर्वसामान्य जनतेचे जगणे त्रस्त झाले आहे. याबाबत अनेकदा तक्रार करूनही पालिकेकडून कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. कुत्रे पकडणारी गाडी गल्लीत उभी करून कुत्रे पकडण्याचा देखावा करून निघून जातात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

stray dogs
जयस्वाल यांनी स्वतःला आरोपी म्हणून पाहावे; राज्य सरकारचा न्यायालयात युक्तिवाद

"एकतर मालाड परिसरातील सरकारी रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन उपलब्ध नसते. सरकारी खर्चाने उपचार हवा असेल, तर त्यासाठी त्यांना मालाडवरून थेट केईएम रुग्णालय गाठावे लागते. लहान मुले तर अक्षरशः घाबरत धावत सुटतात."
- कमलेश देवरुखकर, रहिवासी

"पोटाची खळगी भरण्याकरिता जीव धोक्यात घालून या गल्लीत कामावर यावे लागते. या भटक्या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करणे आवश्यक आहे."
- सीता सेठिया, पीडित

पालिकेच्या पी उत्तर विभाग आरोग्य अधिकारी ऋजुता बारस्कर यांना मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी उचलला नाही. डॉग कंट्रोल अधिकारी पी उत्तर विभाग एस. एन. पाल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आम्ही कुत्र्यांची नसबंदी करून परत पकडलेल्या ठिकाणी नेऊन सोडून देतो. तसेच जर रेबीज झालेला कुत्रा चावला असेल आणि तक्रार अली, तर त्यालाही पकडतो. लेखी तक्रार असेल, तरच कारवाई करता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com