मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: करकरेंनी माझा छळ केला,कर्नल पुरोहितांचा सत्र न्यायालयात जबाब

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: करकरेंनी माझा छळ केला,कर्नल पुरोहितांचा सत्र न्यायालयात जबाब
mlegaon blastsakal

Mumbai News: २००८ साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी विशेष एनआयए न्यायालयात अंतिम जबाब नोंदवला. या जबाबात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे, सह आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी आपला छळ केल्याचे पुरोहित यांनी जबाबात म्हटले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: करकरेंनी माझा छळ केला,कर्नल पुरोहितांचा सत्र न्यायालयात जबाब
Malegaon Bomblast: बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंग यांना २५ एप्रिलला हजर राहण्याचे निर्देश

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट होऊन ६ ठार, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी सुरू आहे. प्रकरणातील संशयित आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी येथील सत्र न्यायालयात अंतिम जबाब नोंदवला.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: करकरेंनी माझा छळ केला,कर्नल पुरोहितांचा सत्र न्यायालयात जबाब
Malegaon Bomb Blast Case: प्रज्ञासिंग ठाकूर यांना २० एप्रिलपासून सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश

२३ पानाच्या जबाबात त्यांनी अनेक आरोप केले आहेत. तत्कालीन एटीएस प्रमुख करकरे, सहआयुक्त परमबीर सिंग आणि इतरांनी त्यांचा छळ केला तसेच स्वत:च्या सहभागाची कबुली देण्याबरोबरच या गुन्ह्यात उजव्या विचारसरणीच्या काही नेत्यांची नावे घेण्यासाठी त्यांनी दबाव टाकल्याचे म्हटले आहे.

तत्कालीन सरकारच्या राजकीय कथनाला अनुरूप एटीएसने खोटा खटला रचला, असा आरोप त्यांनी केला. ऑक्टोबर २००८ साली आपल्याला एटीएसने ताब्यात घेतले व खंडाळा येथे अधिकारी घेऊन गेले तिथे आपल्याला शारीरिक त्रास देण्यात आल्याचे पुरोहित यांनी म्हटले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: करकरेंनी माझा छळ केला,कर्नल पुरोहितांचा सत्र न्यायालयात जबाब
Malegaon Bomb Blast Case: मालेगाव खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने कोर्टाने प्रज्ञा ठाकूरांना फटकारले, NIA टीम जाणार घरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com