esakal | महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक; तर 'या' वयोगटातील कोरोनाग्रस्तांचे प्रमाण जास्त...
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक; तर 'या' वयोगटातील कोरोनाग्रस्तांचे प्रमाण जास्त...

रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी तब्बल 97 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे जाणवत असून त्यातील अनेकजण लक्षणविरहित आहे. तर, गंभीर रुग्णांचे प्रमाण फक्त 2 टक्के आहे आणि 1 टक्के आयसीयूमध्ये उपचार घेत असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. 

महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक; तर 'या' वयोगटातील कोरोनाग्रस्तांचे प्रमाण जास्त...

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडेतीनच्या पार गेली आहे. तर, मृतांचा आकडा 12 हजारांच्या वर गेला आहे. तर, राज्यात एकूण 1 लाख 40 हजार 92 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, असे जरी असले तरी रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांपैकी तब्बल 97 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे जाणवत असून त्यातील अनेकजण लक्षणविरहित आहे. तर, गंभीर रुग्णांचे प्रमाण फक्त 2 टक्के आहे आणि 1 टक्के आयसीयूमध्ये उपचार घेत असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. 

एक अनोखा खटला; हरवलेले बैल सापडले आणि त्याची अटक टळली... ​

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, एकूण रुग्ण संख्येत पुरुषांचे प्रमाण महिला रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे. तर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक पुरूषांचे प्रमाण 61 टक्के असून महिलांचे प्रमाण 39 टक्के आहे. त्यामूळे, कोरोना होण्याचे सर्वात जास्त प्रमाण पुरुषांचे आहे. तर मृत्यू होण्यामध्ये ही पुरुषांचे प्रमाण अधिक असून ते 65 टक्के आहे आणि महिलांमध्ये 35 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 17 लाख 37 हजार 716  नमुन्यांपैकी 3,47,502 ( 20 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत आणि त्यातील 80 टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. 

27 जुलैला शुभेच्छा नको; तर करा 'हे' काम, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

31 ते 40 वयोगटात लोकांने प्रमाण अधिक 
21 ते 30, 31 ते 40 आणि 40 ते 50 या तीन वयोगटातील लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. 31 ते 40 या वयोगटातील 66,811 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ 40 ते 50 वयोगटातील 58,465 आणि 21 ते 30 वयोगटातील 57, 712 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अतिजोखमीच्या आजारांमुळे आतापर्यंत राज्यात 70 टक्के रुग्णांचे मृत्यू झाले असून अन्य 30 टक्के मृत्यू अन्य कारणांमुळे झाले आहेत. 

चांगली बातमी! अखेर 'या' रुग्णांसाठी नायर रुग्णालयाचे दरवाजे खुले

बालकांचे प्रमाण 3.86 टक्केच 
राज्यात 0 ते 10 वयोगटातील 12,591 लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे प्रमाण 3.86 टक्के एवढे असून त्यात गुंतागुंत वाढलेली दिसून आली. गेल्या काही दिवसांत लहान मुलांमध्येही संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. तर 11 ते 21 या वयोगटातील 22,345 मुला- मुलींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

दिलासादायक...रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली... 

सध्या आपण लक्षणे असलेली आणि लक्षणविरहित अशा दोन्ही लोकांच्या चाचण्या करत आहोत . त्यामुळे 50 ते 60 टक्के लोक लक्षणे नसलेले आता आढळून येत आहेत. पूर्वी फक्त ज्यांना लक्षणे दिसत होती त्यांनाच तपासलं जात होतं. त्यामुळे लक्षणविरहीत रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असते. मात्र, त्याचा काही फारसा परिणाम मृत्यूंमध्ये किंवा रुग्णालयांवर होणार नाही. फक्त त्यांच्यातून दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना काही दिवसांसाठी क्वारंटाईन करुन ठेवले पाहिजे. जेणेकरून संसर्ग थांबवता येऊ शकतो.
- डॉ. अविनाश सुपे, कोरोना मृत्यू विश्लेषण समिती प्रमुख

----
संपादन : ऋषिराज तायडे 

loading image
go to top