निसर्ग संवर्धनासाठी एका अवलियाचा अनोखा तप, अशा प्रकारे देतोय आपलं अमुल्य योगदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

वाढत्या औद्योगिकीकरणासाठी नेहमी निसर्गाचा बळी घेतला जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा र्‍हास होत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच सोसावे लागत आहेत.

उरण : उरणमधील एका निसर्गप्रेमीने निसर्ग संवर्धनाचा एक अनोखा छंद जोपासला आहे. आपण खाऊन टाकलेल्या फळांच्या बिया ते गोळा करून त्यांची साठवणूक करतात व पावसाळ्यापूर्वी विविध ठिकाणी जाऊन त्यांचे रोपण करतात. अशा 25 ते 30 हजार बिया ते दरवर्षी रोपण करतात. हितेंद्र घरत असे त्यांचे नाव असून, गेली 21 वर्षे ते हे काम करत आहेत.

 महत्वाची बातमी ठाणेकरांनो! उद्यापासून असा असेल 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून 'नियमावली' जाहीर

वाढत्या औद्योगिकीकरणासाठी नेहमी निसर्गाचा बळी घेतला जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा र्‍हास होत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच सोसावे लागत आहेत. यासाठी झाडे लावणे फार गरजेचे झाले आहे. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून उरणमधील निसर्गप्रेमी घरत फळांच्या हजारो बिया गोळा करून त्या पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला अथवा किल्ले-रानावनात टाकीत आहेत. नैसर्गिक पद्धतीने निसर्गाची ही जपणूक करण्याच्या त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे इतरांनी अनुकरण करणे गरजेचे आहे.

नक्की वाचा : शेवटी जे नको व्हायला हवं होतं ते झालंच, ज्यांनी केला कामाठीपुरा कोरोनमुक्त शेवटी त्यांनाच...

अंब्याचे बाठे, जांभळाच्या बिया, चिंचेचे चिंचोके, काजू ,फणस खाल्ल्यानंतर त्याच्या निघालेल्या बिया अशा अनेक फळांच्या बिया उरण केंगाव येथील सिडको कर्मचारी असलेले हितेंद्र सदाशिव घरत हे गोळा करतात. त्या उन्हामध्ये कडक सुकवून पोत्यामध्ये साठवून ठेवतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंगलात, रस्त्याच्या कडेला टाकून देतात. दर वर्षी ते पंचवीस ते तीस हजार बिया कुठल्या ना कुठल्या जंगलात पेरत आहेत. 

नक्की वाचा : मुंबईतीलं सलून सुरु झाले खरे, पण छोट्या व्यावसायिकांना भेडसावतोय हा प्रश्न...

झाडांची कत्तल होऊन निसर्गाचा समतोल ढासळत चालल्याने त्याच्या दुष्परिणामांचा सामना आपल्याला करावा लागत आहे. यामुळे निसर्गाची जपणूक करण्यासाठीच झाडांच्या बिया पेरण्याचे काम गेली 21 वर्षे करीत आहे. यापुढेही करीत राहणार आहे. यातील जगलेल्या झाडांच्या फळांचा आस्वाद सर्वांना घेता येतोच; पण निसर्गाची जपणूक केल्याचा आगळावेगळा आनंद मिळत आहे.
- हितेंद्र घरत, निसर्गप्रेमी

a man fruit seeds are collected and planted in different places before the rainy season


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a man fruit seeds are collected and planted in different places before the rainy season