पुणे : खुन्याला जन्मठेप, तर मदत करणाऱ्याला दोन वर्षे तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

या प्रकरणात पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. यावर युक्तीवाद करत अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली होती.

पुणे : सोन्याचा गोफ चोरण्याच्या उद्देशाने पाच वर्षांपूर्वी एका व्यक्तीचा खून करणाऱ्यास जन्मठेप आणि दहा हजार रुपयांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर चोरलेले सोने गहाण ठेवण्यासाठी मदत करणाऱ्यास दोन वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

महाराष्ट्रातही यंदा फटाक्‍यांना बंदी घाला; पुणेकराने उच्च न्यायालयात केली याचिका दाखल​

अश्रूकांत दादाराव कांबळे (रा. घोटावडे, ता. मुळशी) असे जन्मठेप सुनावलेल्याचे, तर चेतन कृष्णदास गुजर असे दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायधीश एस. एच. ग्वालानी यांनी शिक्षा सुनावली. शंकर ज्ञानेश्‍वर धुमाळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. धुमाळ हे मुळशी तालुक्‍यातील घोटावडे येथे राहात होते. तर कांबळे याने धुमाळ यांच्या गळ्यात असलेला 12 तोळे वजनाच्या सोन्याचा गोफ चोरण्यासाठी त्यांचा 4 सप्टेंबर 2015 या दिवशी केळकर मळ्याच्याजवळ असलेल्या बैलगाड्यांच्या घाटाजवळ धुमाळ यांचा धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. त्यानंतर कांबळेने चोरलेल्या सोन्याच्या गोफेतून अर्धा तुकडा त्याचा मित्र चेतन गुजर याच्या मदतीने 5 सप्टेंबर 2015 रोजी एका फायनान्स कंपनीत गहाण ठेवून 59 हजार 400 रुपये घेतले होते.

US Election 2020 : ट्रम्प यांना धक्का; पेन्सिल्वेनियात आघाडीमुळे बायडेन यांचा विजय निश्चित

या प्रकरणात पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. यावर युक्तीवाद करत अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली होती. या प्रकरणामध्ये त्यांनी सतरा साक्षीदार तपासले. त्यापैकी आरोपींनी सोने गहाण ठेवलेल्या फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजासाठी पौड पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी विजय चौधरी यांनी मदत केली. पोलीस निरीक्षक विश्‍वभंर गोल्डे यांनी या प्रकरणाचा तपास केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A man sentenced to life imprisonment for killing a man and stealing a gold