'तू दरवाजा उशिराच का उघडला?' असं म्हणत डोक्यात आणि छातीत टाकला...

'तू दरवाजा उशिराच का उघडला?' असं म्हणत डोक्यात आणि छातीत टाकला...

देशभरात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. किडे-मुंग्या माराव्यात तसं एकमेकांचा खून केला जातो. अशीच एक धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडलीये. उल्हासनगरमध्ये मित्रानंच मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. कारण वाचाल तर आपण कुठे जातोय असा प्रश्न नक्की पडेल. 

रामजीत विश्वकर्मा आणि दिनेशकुमार गुप्ता हे दोघंही मुंबईत कामाच्या शोधत आले होते. दोघे उल्हासनगरमध्ये रूम भाड्यानं घेऊन राहत होते. काही दिवसांआधी रामजीत रात्री उशिरा घरी आला मात्र दिनेशकुमार त्यावेळी झोपला होता. दार उघडायला उशीर झाल्यामुळे रामजीत संतापला आणि त्यानं दिनेशकुमारच्या डोक्यात जड वस्तुनं वार केले. यात दिनेशकुमारचा जागीच मृत्यू झाला.

नक्की काय आहे प्रकरण: 

१५ फेब्रुवारीला दिनेशकुमारचं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं मृत शरीर शेजारच्या लोकांना दिसलं. यावेळी रामजीतही होता. रामजीत आणि शेजऱ्यांनी पोलिसांना बोलवलं. दिनेशकुमार बहुतेक दारू प्यायला असावा आणि त्यात अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला असावा असं रामजीत याने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि दिनेशकुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

मात्र दिनेशकुमारचा मृत्यू डोक्यावर आणि शरीरावर वार केल्यामुळे झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं. या घटनेचा तपास सुरू असताना रामजीत हा परिसरातून पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान रामजीत यानं आपणचं दिनेशकुमार याची हत्या केली असल्याचं कबूल केलं. "दिनेशकुमार यानं दार उघडायला उशीर केला त्यामुळे मी रागाच्या भरात जड वस्तु उचलून त्याच्या डोक्यावर आणि छातीवर वार केले" असं आरोपीनं पोलिसांना सांगितलं आहे. 

पोलिसांनी आरोपी रामजीत याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

man took extreme step after his friend got late to open the door                

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com