
मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. घाटकोपरजवळच्या पूर्व द्रुतगती मार्गावर रविवारी संध्याकाळच्या सुमारास वाहनांमधील किरकोळ वादाचे गंभीर रूपांतर झाल्याने झीशान शेख (वय ३०) या युवकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.