Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

Manikrao Kokate receives High Court relief as bail is granted : नाशिक पोलिसांचे पथक काल रात्री कोकाटेंच्या अटकेसाठी मुंबईतील लिलावती रूग्णालयात पोहचले होते.
Manikrao Kokate

Manikrao Kokate

sakal 

Updated on

Manikrao Kokate Gets High Court Relief : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एक लाख रुपायंच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता तूर्तास तरी त्यांची अटक टळली आहे.

याप्रकरणी आज हायकोर्टात जवळपास दोन तास युक्तिवाद सुरू होता. नाशिक कोर्टाने माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांचा दंड ठोठवला होता. यानंतर कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली होती, यावर आज दोन तास सुनावणी चालली. हायकोर्ट नेमका काय निकाल देणार याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र हायकोर्टाने कोकाटेंना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान काल अटक वॉरंट घेवून नाशिक पोलिस मुंबईत दाखल झाले होते. आधी वांद्रे पोलिसांशी चर्चा करून आणि नंतर कोकाटेंवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन अटकेची कारवाई करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक रात्री उशीरी लीलावती रूग्णालयात पोहचले होते.

Manikrao Kokate
Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

याआधी काल संध्याकाळी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला होता. त्यानंतर नाशिक पोलिस कोकाटेंच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अटक वॉरंट घेऊन नाशिकवरून मुंबईत कोकाटे उपचार घेत असलेल्या लीलावती रूग्णालयाकडे रवाना झाले होते.

Manikrao Kokate
Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

तर कोकाटे यांच्याकडील मंत्रिपदाचा कार्यभार बुधवारी रात्रीच काढून घेण्यात आला होताआणि त्यांची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती. त्यामुळे काही तास कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी केलेल्या मागणी नंतर कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले होते. त्यांच्याकडे सध्या क्रीडा खाते होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com