

Shiv Sena leaders meet Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and demand a forensic investigation into the alleged audio clip following Manoj Jarange's 500 crore allegation
esakal
५०० कोटींच्या कथित प्रकरणाचे पडसाद आता मुंबईतील राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलन बदनाम करण्यासाठी ५०० कोटी रुपये दिल्याचा आरोप करत कथित ऑडिओ क्लिप सादर केली. या प्रकरणानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, संबंधित क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.