Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून आझाद मैदानावर जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, सोमवारी हायकोर्टानं आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरीक्षण नोंदवल्यानंतर सीएसएमटी, बीएमसी परिसरातील आंदोलकांच्या गाड्या हटवण्यात आल्या आहेत. आता मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस बजावलीय. आज दुपारी हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. यात हायकोर्ट काय आदेश देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.