मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

Manoj Jarange Patil Mumbai Andolan मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार असल्याचं जाहीर केलंय. मराठा बांधवांनो तुम्ही तयार रहा, योग्य वेळी तुम्हाला बोलावेन असं जरांगे पाटील म्हणालेत.
Manoj Jarange Announces Mumbai Protest Plan, Appeals to Maratha Community

Manoj Jarange Announces Mumbai Protest Plan, Appeals to Maratha Community

Esakal

Updated on

मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांनीही जरांगे पाटलांना पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठ्यांची खिंड आता एकटा लढवणार आहे. मी मुंबईला एकटाच जाईन, कशी परवानगी नाकारतात बघू असं म्हणत जरांगे पाटील हे मुंबईला जाणारच यावर ठाम आहेत. फक्त मराठा समाजाला सध्या मुंबईला न येण्याचं आवाहन केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com