Manoj Jarange Patil: पंकजा व धनंजय मुंडे मंत्री झाल्याने काही लोकांना त्रास होतोय, जरांगे पाटलांवर कारवाई करा

Latest Navi Mumbai News: वंजारी समाजाने जरांगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात कळंबोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांना निवेदन देण्यात आले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilesakal
Updated on

Navi Mumbai: मस्साजोगमधील संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढण्याचे काम चालू केले आहे.

परभणीमधील मोर्चामध्ये जरांगे यांच्या वक्तव्यामुळे वंजारी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत कळंबोलीमधील वंजारी समाजाने जरांगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात कळंबोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांना निवेदन देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com