
मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधवही मुंबईत आले आहेत. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून शिंदे समितीने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अर्ध्या तासाहून अधिक काळ झालेली ही चर्चा निष्फळ ठरली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर तात्काळ काढावा. थेट अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. तर शिंदे समितीकडून वेळ मागण्यात आला. दरम्यान, शिंदे समितीने मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कळवले आहे.