कोरोनामध्ये मृत्यू नको रे बाबा! डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणि रुग्णवाहिकेसाठी नातेवाईकांची फरफट...

मिलिंद तांबे
Wednesday, 15 July 2020

अनेक लोकांचा काही ना काही कारणाने घरीच दीर्घकालीन आजाराने,  हृदयविकाराने तर कधी नैसर्गिक मृत्यू होतो. अशावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक डॉक्टर घरी येण्यास नकार देतात.

मुंबई :  कोरोना संसर्गाची दहशत ही केवळ सर्वसामान्य लोकांवरच नाही तर रुग्णालय प्रशासन तसेच डॉक्टरांवरही आहे. अनेक खासगी रुग्णालये नवीन रुग्णास दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत, तर खासगी दवाखाने चालवणारे डॉक्टरही घरी येऊन रुग्णाला तपासण्यास नकार देत आहेत. अशा परिस्थितीत घरीच अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांची फरफट सुरू आहे.

बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही; नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांचा अधिकाऱ्यांना इशारा...

कोरोना संसर्गामुळे बाधित रुग्णांसह घरी दगावणाऱ्या मृतकांच्या नातेवाईकांची फरफट होत आहे. नातेवाईकांना डॉक्टरांसाठी वणवण भटकावे लागत आहे तर रुग्णवाहिका ही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शव तासनतास घरात ठेवावे लागते असून कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

संकटांना आवरा हो ! कोरोनासोबत मलेरियाच्या वाढत्या रुग्णांनी पालिकेची चिंता वाढवली

अनेक लोकांचा काही ना काही कारणाने घरीच दीर्घकालीन आजाराने,  हृदयविकाराने तर कधी नैसर्गिक मृत्यू होतो. अशावेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक डॉक्टर घरी येण्यास नकार देतात. एखादा डॉक्टर घरी येण्यास तयार झाला तरी तो व्हिजिट चार्ज म्हणून 10 ते 15 हजार रुपयांची मागणी करतो. अशावेळी नेमके काय करायचे, असा प्रश्न पीडित कुटुंबाला पडतो.

मोठी बातमी : २६ जुलैपासून सुरु होणार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, 'असे' आहेत प्रवेशासाठीचे तीन टप्पे

अनेकदा शव घेऊन रुग्णालयांत जावे लागते. त्यावेळी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. मात्र, रुग्णवाहिका सहजासहजी उपलब्ध होत नाही. रुग्णवाहिकेसाठी 3 ते 4 तास वाट पाहावी लागते. एखादी रुग्णवाहिका मिळालीच तरी 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये दर आकारला जातो. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबियांना दुःख मागे सारून पैशांची जमवाजमव करावी लागते.

ठाणे जिल्हा परिषदेवर पुन्हा भगवा; अध्यक्षपदी लोणे, तर उपाध्यक्षपदी पवार 

कोरोना संसर्ग पसरल्यापासून राज्यात गेल्या 4 महिन्यात एकूण 10,780 मृत्यूंची नोंद करण्यात आली. त्यातील 10,482 म्हणजे साधारणतः 97 टक्के मृत्यू हे कोरोना आजारामुळे झाले असून केवळ 298 म्हणजे 2.8 टक्के मृत्यू हे कोरोना शिवाय इतर कारणांमुळे झाले आहेत. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे मुंबईत झाले असून इतर कारणांमुळे झालेले सर्वाधिक मृत्यूंची नोंदही इथेच झाली आहे. कोरोनामुळे मुंबईत 5,402 मृत्यू झाले असून इतर कारणांमुळे 289 मृत्यू झाले आहेत. 
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many doctors and ambulance to check dead body at home amid corona outbreak