कोरोनाकाळात रक्तदान, प्लेटलेट्स दानाला वाढता प्रतिसाद; अनेकांकडून पुढाकार 

भाग्यश्री भुवड
Wednesday, 12 August 2020

माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोविंद पथकाने पुढाकार घेऊन 11 ऑगस्ट या दिवशी प्लेटलेट्स दान करण्याचा सामाजिक उपक्रम राबवला.

मुंबई : मुंबईत सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून इतर अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे तसेच प्लाझ्मादान करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आता प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. सध्या मुंबईवर कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्वच सण साध्या पद्धतीने साजरे केले जाणार आहेत. मात्र, सर्व मंडळे पुढाकार घेऊन वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत आहे.

नवी मुंबईतील खासगी रुग्णांच्या लुटमारीला महापालिकेचा चाप; आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोविंद पथकाने पुढाकार घेऊन 11 ऑगस्ट या दिवशी प्लेटलेट्स दान करण्याचा सामाजिक उपक्रम राबवला. त्यात एकूण 19 जणांनी प्लेटलेट्स दान केले. या पथकातील किरण म्हात्रे यांनी स्वतःच्या 50 व्या (SDP)अर्थात सिंगल डोनर प्लेटलेट्सच्या सुवर्णमहोत्सवी रक्तदानानिमित्ताने परळ येथील टाटा रुग्णालयातील रक्तपेढीत या शिबिराचे आयोजन केले. यावेळी जवळपास 19 जणांनी प्लेटलेट्स दान केले. 

IPL खेळण्याचं स्वप्न अधूरं! मुंबईकर क्रिकेटपटूनं संपवलं जीवन

प्लेटलेट्सचा वापर मुख्यतः कॅन्सर रुग्णांसाठी केला जातो. सहा रक्तदानाच्या युनिटमधून मिळणाऱ्या प्लेटलेट्सच्या बरोबरीचे 1 सिंगल डोनर प्लेटलेट्सचे युनिट असते. असे एकूण 19 सिंगल डोनर प्लेटलेट्स दान करण्यात आले. म्हणजे 114 रक्तदात्यांच्या रक्तदानातून जेवढे प्लेटलेट मिळेल त्या बरोबरीचे प्लेटलेट दान झाले आहे.

मुंबई पालिकेच्या 'या' रुग्णालयात लवकरच सुरु होणार पोस्ट कोविड OPD

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक रक्तदाते रक्तदानासाठी पुढे येत नाहित. त्यातुन, अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. हीच कमतरता भरुन काढण्यासाठी अनेक मंडळे रक्तदान, प्लाझ्मा दान, प्लेटलेट्स दानासाठी पुढे सरसावली आहेत.
-----------
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many peoples come forword to donate blood and platelates amid corona virus