मुंबईत विमानं उतरलीत तर होऊ शकतो मोठा गोंधळ, देशांतर्गत सुरु होणाऱ्या विमानसेवेबद्दल 'सर्वात मोठी' बातमी

प्रशांत कांबळे
शनिवार, 23 मे 2020

विमानसेवा सुरु करण्यावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा आक्षेप

मुंबई: सोमवार (ता.25) पासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याची तयारी पुर्ण झाली आहे. मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विमानसेवा सुरु करण्यावर आक्षेप घेतला आहे. 31 मे पर्यंत चौथा लॉकडाऊन सुरु आहे, त्यामुळे सोमवारपासून विमान सेवा प्रत्यक्षात सुरु होईल हा प्रश्नच आहे. 

मुबंईतील बहुतांश टॅक्सी, ओला, उबेर चालक त्यांच्या राज्यात निघून गेले आहे. त्यामूळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या नियोजीत ठिकाणी सोडण्याचा प्रश्न  निर्माण होणार आहे.  मुंबईत अनेक रुग्णांना टॅक्सी,रुग्णवाहिका मिळत नाही. मग या प्रवाशांना सोडण्याची जबाबदारी घेणार कोण, हा प्रश्न कायम आहे. मुंबईतील कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात या विमान प्रवाशांना क्वारंटाईनच्या नियमातून सुट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने परस्पर घेतला आहे. त्यावरही राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे.

मोठी बातमी - उद्धव ठाकरे यांचं 'मोठं' विधान, कोरोनाबाबत पालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी साधला संवाद

देशाअंतर्गत आंतरदेशीय म्हणजेच डोमॅस्टिक विमानतळ सुरू केल्यास 33 टक्के क्षमतेने सुमारे दिवसाला 150 विमाने उड्डाण करणार आहे. मात्र राज्य सरकार अनूकूल नसल्यामुळे प्रवाशी आणि विमान कर्मचाऱ्यांच्या वाहतूकीचा प्रश्न निर्माण होणार आहे.

विमान कंपन्यांचा सावध पवित्रा 

राज्य सरकारची भूमिका लक्षात घेता, गो एयरने 25 मे किंवा त्यानंतरचं  तिकीट बुकींगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे. प्रवाशांना कुठलीही अडचण होऊ नये म्हणून त्या त्या राज्याच्या मंजूरीनंतर विमानसेवा सुरु करणे योग्य राहील असही, गो एयरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

अनेक कंपन्यांचा विमानसेवा सुरु करण्याबाबत आक्षेप 

विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. चौथ्या लॉकडाऊनची घोषणा सुद्धा केंद्रानेच केली. त्यामूळे केवळ महाराष्ट्रानेच नाही तर अनेक राज्यांनी विमान सेवा सुरु करण्यासंदर्भात आक्षेप घेतला आहे. अद्याप विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात स्पष्टता नाही. -- राजेश टोपे, आरोग्य मंत्री

मोठी बातमी -  राऊतांचा राज्यपालांना वाकून कोपरापासून दंडवत, फोटो झाला व्हायरल; फोटोवर संजय राऊत राज्यपाल म्हणतात...

विमानसेवा सुरु करण्यावरचे आक्षेप

  • सोशल डिस्टन्सिंगला फाटा, तिन्ही सिटवर प्रवासी घेण्याची मुभा
  • विमान प्रवाशांना 14 दिवसाच्या क्वारंटाईनपासून सुट
  • या प्रवाशांमुळे नव्याने कोरोनाचा फैलाव होण्याची भिती
  • विमानसेवा सुरु करतांना राज्यांना विश्वासात घेतले नाही
  • लॉकडाऊन सुरु असतांना, विमान कर्मचारी, प्रवाशांच्या वाहतूकीचा प्रश्न
  • मुंबईत कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना, या प्रवाशांची रिस्क कोण घेणार

many states are opposing for resuming domestic flights question mark on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many states are opposing for resuming domestic flights question mark on