उद्धव ठाकरे यांचं 'मोठं' विधान, कोरोनाबाबत पालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर

मुंबई : मुंबईतरुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 14 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण ही लढाई लढत आहात आणि त्यामुळेच आपण निश्चितपणे कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबवू शकतो,असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या विविध रुग्णालयांचे डीन, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली. यामध्ये प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ. संजय मुखर्जी, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने देखील सहभागी होते.

मोठी बातमी - ठाकरे स्मारकावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक; मुंबईत राजकीय घडामोडीना वेग

एकीकडे आपण या वैद्यकीय आणीबाणीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेले सर्व निदेश आणि प्रोटोकॉल काटेकोर पाळत आहोत. तसेच प्लाझ्मा थेरपी, प्लस ऑक्सिमीटरचा उपयोग या माध्यमातून उपचारामध्ये सहाय्यभूत ठरेल, अशी पाऊले उचलत आहोत. पुढील काळासाठी आपण फिल्ड हॉस्पिटल उभारणीवर भर दिला पाहिजे तसेच सुसज्ज कंट्रोल रूमच्या माध्यमातून कोरोना विषयक वैद्यकीय सेवा आणि सुविधाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मन सुन्न करणारी बातमी -  कोरोनाने मुंबईतली नोकरी गेली; चक्री वादळाने बंगालमधील घरही उद्धवस्त झाले

पावसाळी आजारांचे आव्हान : 

मुंबईत विविध ठिकाणी आयसीयू आणि आयसोलेशन बेड्सची सुविधा आपण निर्माण केली आहे. या सुविधांचा उपयोग करण्याची वेळ येऊ  नये .परंतु आपले नियोजन चांगले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, येणाऱ्या पावसाळ्यात लेप्टो, डेंग्यू सारख्या आजारांमुळे रुग्ण वाढतील. त्यावरही तातडीने उपचार करावे लागतील यादृष्टीने पालिकेने तयारी ठेवावी.

uddhav thackeray spoke to municipal corporation doctors said we will overcome corona soon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray spoke to municipal corporation doctors said we will overcome corona soon