'राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या विषयावर घोळ घालतंय'

पूजा विचारे
Wednesday, 20 January 2021

राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या विषयावर घोळ घालत आहे. राज्य सरकारच्या मनात नेमकं काय आहे हे समजत नाही, असं फडणवीस म्हणालेत.

मुंबईः  मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज झालेल्या सुनावणीत घटनापीठाने कोणताही निर्णय दिला नसून पुढील सुनावणी ही 5 फेब्रुवारीला होणार आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या विषयावर घोळ घालत आहे. राज्य सरकारच्या मनात नेमकं काय आहे हे समजत नाही, असं फडणवीस म्हणालेत. मराठा आरक्षणाच्या घोळाची आजची परिस्थिती सरकारच्या घोळामुळे असल्यची टीकाही फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सरकार एक ठाम भूमिका मांडू शकत नाही आहे. प्रत्येक वेळी सरकार न्यायालयात वेगळी भूमिका मांडत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी सरकारवर केला आहे. राज्य सरकारमध्ये एमपीएससी आरक्षणावरुन प्रचंड मतभेद आहेत. सगळ्या आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशी कृती राज्य सरकारची दिसत आहे, असंही ते म्हणालेत. 

भाजप नेत्यांचं समाधान करुन काय कराल, मराठा समाजाचं आरक्षण समाधान कराल, आम्हाला यांनी चर्चेला देखील बोलावलं नाही आहे. पण आमची काही तक्रार नाही, असंही फडणवीस म्हणालेत. 

हेही वाचा- Corona Vaccination: पालिका मुंबईत कोरोना लसीकरण केंद्रात करणार वाढ

Maratha Reservation Supreme Court devendra fadnavis on state government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Reservation Supreme Court devendra fadnavis on state government