मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरागे यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. आजपासून त्यांनी पाणी न पिण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार दबाव वाढताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.