esakal | ठाकरे सरकार परप्रांतीयांना 'मराठी'चा धडा शिकवणार; लवकरच उपक्रम सुरू होणार
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे सरकार परप्रांतीयांना 'मराठी'चा धडा शिकवणार; लवकरच उपक्रम सुरू होणार

मुंबईतील परप्रांतीय नागरिकांमध्ये मराठी भाषेची गोडी लागावी, या हेतूने राज्य सरकार परप्रांतीय ऑटोरिक्षा, टॅक्‍सीचालक, फेरीवाले आणि मजुरांना मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

ठाकरे सरकार परप्रांतीयांना 'मराठी'चा धडा शिकवणार; लवकरच उपक्रम सुरू होणार

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई  : मुंबईतील परप्रांतीय नागरिकांमध्ये मराठी भाषेची गोडी लागावी, या हेतूने राज्य सरकार परप्रांतीय ऑटोरिक्षा, टॅक्‍सीचालक, फेरीवाले आणि मजुरांना मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेणार आहे. 1 मेपासून या उपक्रमाची सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यात पाच हजार जणांना मराठी भाषा विभागाच्या वतीने धडे देण्यात येणार आहे. दरम्यान, मराठीच्या शिकवणीला मात्र टॅक्‍सीचालक संघटनांनी विरोध केला आहे. 

सकाळ सन्मान सोहळा | नागरिकांची चिंता दूर करणाऱ्यांचा सन्मान : शरद पवार

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

परप्रांतीय कामगार तसेच स्थानिकांमध्ये अनेकदा भाषेअभावी योग्य संवाद होत नाही. प्रसंगी गैरसमजही निर्माण होतात. त्यासाठी ऑटोरिक्षा, टॅक्‍सीचालक तसेच फेरीवाल्यांचे राज्य सरकारच्या मराठी विभागाच्या वतीने शिकवणी वर्ग घेण्यात येणार आहेत. त्यासाठी परप्रांतीय कामगारांशी संपर्क साधला जात आहे. वाहनचालक स्वतःहून या शिकवणीसाठी नोंदणी करू शकतात, असे परिवहन विभागाने सांगितले.

सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे

मराठी भाषेच्या शिकवणी वर्गासाठी राज्य सरकार बृहन्मुंबई महापालिका आणि शहरातील स्थानिक नगरसेवकांची मदत घेतली जाणार आहे. काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेही मराठी शिकवली जाणार असल्याचे मराठी भाषा विभागाने सांगितले आहे. 

मुंबई, ठाणे विभागासाठी एक मेपासून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यानंतर राज्यभरात त्याचा विस्तार करण्याचा विचार आहे. 
- प्राजक्ता लवंगरे वर्मा,
सचिव, मराठी भाषा विभाग. 

स्वतः मराठी भाषक मराठी बोलत नाहीत; मग टॅक्‍सीचालक, फेरीवाल्यांना परप्रांतीयांचा शिक्का मारून त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. मोटार वाहन कायद्यात जी व्यावसायिक भाषा सर्व कामगारांना येते, त्याच भाषेचा उल्लेख केला आहे. 
- ए. एल. क्वॉड्रोस,
अध्यक्ष, टॅक्‍सी मेन्स युनियन. 

राज्य सरकारने यापूर्वीच मराठी भाषेचे धडे द्यायला हवे होते; तरीही आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. ज्या कामगारांचा उदरनिर्वाह मराठी भाषकांच्या जोरावर चालतो, त्यांनी मराठी भाषा शिकायला काय हरकत आहे? 
- अखिल चित्रे,
सरचिटणीस, म्युनिसिपल कामगार सेना. 

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

The Marathi department of the state government will conduct teaching classes for outer state people