
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना बंदी प्रकरणी वाद उफाळला आहे. नुकतेच मुंबईतील प्रतिष्ठित दादर कबुतरखाना ट्रस्टने आता एक बोर्ड लावला आहे आणि कोणीही कबुतरांना खाऊ घालू नये असे आवाहन केले आहे. जर कोणतीही कारवाई झाली तर ट्रस्ट जबाबदार राहणार नाही असे ट्रस्टने स्पष्ट केले आहे. ट्रस्टने या संदर्भात महानगरपालिकेकडे परवानगी मागितली असून महानगरपालिकेने सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत कबुतरांना खाऊ घालण्याची तोंडी परवानगी दिली आहे.