Mumbai Marathi Dispute : मुंबईत ‘मराठी’चा मुद्दा पुन्हा तापला, गुजराती सोसायटीत मराठी पत्रके वाटण्यास विरोध?

नोकरी मुंबईतील, गिरगावात...पण त्यासाठी मराठी लोक नकोत, एका आयटी कोड नामक इन्फोटेक एचआर कंपनीने आपल्या जाहिरातीमध्ये थेट असा उल्लेख केला.
Marathi Language Dispute
Marathi Language Disputesakal

मुंबई - नोकरी मुंबईतील, गिरगावात...पण त्यासाठी मराठी लोक नकोत, एका आयटी कोड नामक इन्फोटेक एचआर कंपनीने आपल्या जाहिरातीमध्ये थेट असा उल्लेख केला. त्यानंतर या महिलेने माफी मागितली मात्र रविवारी (ता.६) घाटकोपरच्या गुजराती सोसायटीत मराठी पत्रके वाटण्यावर कार्यकर्त्यांना विरोध झाल्याने ऐन लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘मराठी’चा मुद्दा तापू लागला आहे.

गिरगाव परिसरातील एका कंपनीने ग्राफिक डिझायनर पदासाठी अर्ज मागवले. मात्र या जाहिरातीमध्ये ‘मराठी उमेदवार नकोत’ असा स्पष्ट उल्लेख केला. याचे तीव्र पडसाद उमटले. ‘आम्ही गिरगावकर’ टिमने या मानसिकतेचा जाहीर निषेध केला.

तसेच या कंपनीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा इशाराही आम्ही गिरगावकर या टीमच्या मिलिंद वेदपाठक यांनी दिला. हा वाद संपत नाही तोच उत्तर पूर्व मतदारसंघात महायुतीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा प्रचार सुरु असताना घाटकोपरमधील समर्पण या गुजराती बहुल सोसायटीत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आल्याची घटना समोर आली.

शाखाप्रमुख प्रदीप मांडवकर यांनी याबाबत ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की, प्रचारासाठी आम्ही सोसायटीमध्ये जात असताना मराठी भाषिक म्हणून आम्हाला रोखण्यात आले. दरम्यान सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळला आहे. त्या वेळेत सोसायटीत भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांना प्रचारासाठी वेळ दिली होती. त्याच वेळी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते याठिकाणी आल्याने त्यांना आम्ही नंतर यावे, असे सांगितल्याचे या सोसायटीतील रहिवासी जतीन भानुशाली यांनी सांगितले.

राजकीय वातावरण तापले ...

गिरगाव तसेच घाटकोपर प्रकरणामुळे मराठी विरुद्ध गुजराती असा वाद भडकण्याची समाजमाध्यमावंर पेटला असून, एक अमराठी मुलगी नोकरीसाठी जाहिरात देताना मराठी माणूस नोकरी साठी नकोय..!! इतकं स्पष्ट जाहीर लिहिते. यांची हिंमत एवढी कशी काय वाढली, काय कारण असेल!

याला जबाबदार कोण यांचा विचार करा आणि मतदान करा अशा आशयाचे पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत आहे. यासोबत मनसेचे राज ठाकरे शांत झाल्याचीही टीका समाजमाध्यमांवर सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com