चास व वाडा येथे दहावीची परीक्षा सुरळीत सुरू

राजेंद्र लोथे
गुरुवार, 1 मार्च 2018

चास : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येत असलेली दहावीची परीक्षा गुरुवारी (ता. 1) चास व वाडा केंद्रावर सुरळीत सुरू झाली. या परिक्षेसाठी चास येथे जवाहर विद्यालय चास येथिल 147 विद्यार्थी, पाडळी येथील विद्यालयातील 52 तर वेताळे येथील 81 विद्यार्थी असे एकूण 280 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

वाडा केंद्रावर कर्मवीर विद्यालय व राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालय वाडा येथील 110 विद्यार्थी, मळूदेवी विद्यालय वाळद 27 विद्यार्थी, शिवाजी विद्यालय डेहणे 100 विद्यार्थी, भीमाशंकर विद्यालय आव्हाट 21 विद्यार्थी, शासकीय आश्रमशाळा चिखलगाव 31 विद्यार्थी व टोकावडे येथील विद्यालयातील 41असे एकूण 330 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 
आज मराठीचा पहिला पेपर असल्याने पालक विद्यार्थ्यांसमवेत शुभेच्छा देण्यासाठी आले होते

Web Title: Marathi news mumbai news 10th exam starts