दारूबंदीच्या मागणीसाठी खुटलच्या महिलांचे पोलीस प्रशासनाला साकडे

दिलीप पाटील
सोमवार, 22 जानेवारी 2018

वाडा (पालघर) : वाडा तालुक्यातील खुटल हे संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असलेले गाव. या गाव व पाड्यावर खुलेआम गावठी दारू बनवून तिची विक्री केली जाते. त्यामुळे गावातील महिला याला कंटाळल्या असून त्यांनी वाड्याच्या पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन देऊन दारूबंदी साठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.

खुटल हे आदिवासी लोकवस्ती असलेले गाव असून या गावातील गरेलपाडा, डोंगरपाडा, माळपाडा, बरफपाडा, खंडीचापाडा, धोदडेपाडा, आंबातपाडा या भागात खुलेआम हातभट्टीची दारू बनवून तिची विक्री केली जात आहे. त्यामुळे गाव व आजूबाजूच्या परिसरातील तरूण व्यसनी होत आहेत. परिणामी संसार उघडय़ावर येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यातच व्यसनामुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्नही गंभीर होतो यासाठी या गावातील महिलांनी पुढाकार घेऊन गावात दारूबंदीचा निर्णय घेतला असून गाव परिसरात नागरिकांच्या माहितीसाठी फलक लावून जनजागृती केली आहे. पोलीस प्रशासनाने दारूबंदीसाठी महिलांना सहकार्य करावे अशी मागणी करणारे निवेदन वाडा पोलीस ठाण्यात दिले आहे. या निवेदनावर गाव पाड्यातील 94 महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Marathi news wada news liquor banned